मुंबई: ‘शिवसेनेत गुप्त काही होत नाही. खासदार व विरोधी पक्षनेते यांची भेटही गुप्त नव्हती. मुख्यमंत्र्यांना या भेटीची कल्पना होती,’ अशी माहिती परिवहन मंत्री अॅड. यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून शिवसेना व भाजपमध्ये टोकाचं राजकीय वितुष्ट आलं आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडत नाहीत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे भाजपवर टीका करण्यात आघाडीवर असतात. भाजपचे नेतेही त्यांना उत्तरं देत असतात. असं असताना दोन दिवसांपूर्वी अचानक संजय राऊत व फडणवीस मुंबईतील एका हॉटेलात भेटले. तब्बल दोन तास त्यांच्यात चर्चा झाली. या भेटीमुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. ‘सामना’च्या मुलाखतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट होती, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. तर, फडणवीसांच्या बाजूनंही खुलासा करण्यात आला. मात्र, याबद्दलची चर्चा काही केल्या थांबत नव्हती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतल्या. शिवसैनिकांमध्येही या भेटीचे पडसाद उमटले होते. त्यातच आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांशी चर्चा केली. त्यामुळं नेमकं चाललंय का, अशी चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी नवी माहिती दिली आहे. ‘राऊत-फडणवीस भेटीचे वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. मुलाखतीबाबत ही भेट होती. दोन्ही नेत्यांनी याबाबत खुलासा केला आहे. राजकारणात व्यक्तिगत शत्रुत्व आम्ही मानत नाही. मुख्यमंत्र्यांनाही या भेटीची कल्पना होती, असं परब म्हणाले. ‘शिवसेनेच्या आमदारांशी मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघातील कामांबाबत चर्चा केली. महाविकास आघाडीतील इतर पक्षांच्या आमदारांसोबतही मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत, असंही परब यांनी सांगितलं.

शिवसेनेच्या बदनामीची भरपाई कोण देणार?

सुशांतसिंह राजपूत हा ड्रग्ज घ्यायचा हे आता समोर आलं आहे. सीबीआयच्या चौकशीनं नेमकं काय साध्य झालं? या प्रकरणात छाती बडवून घेणारे आता कुठे आहेत, अशा प्रश्नांची सरबत्ती करतानाच, या प्रकरणात शिवसेनेची नाहक बदनामी केली गेली. त्याची भरपाई कोण करणार,’ असा सवाल परब यांनी केला. बिहारचे माजी पोलीस महासंचालक लिहून दिलेली स्क्रीप्ट वाचत होते, असा चिमटा त्यांनी काढला. सुशांत प्रकरण आणि बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाच्या बातम्या मीडियात २४ तास दाखवल्या जात आहेत. या मंडळींनी देशासाठी मोठं योगदान दिल्याप्रमाणे हे सगळं सुरू आहे. कोणाला किती महत्त्व द्यायचं हे ठरवण्याची वेळ आली आहे,’ असंही परब म्हणाले.

वाचा: वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here