मुंबईतील सुप्रसिद्ध मूर्तीकार यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व मुलगा निखिल असा परिवार आहे.

खातू यांच्यावर आज दुपारी २ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते, अनेक राजकीय पक्षांचे मान्यवर, मित्र परिवार आणि कुटुंबीय हजर होते.

वाचा:

वयाच्या सोळाव्या वर्षापासून राजन खातू हे मूर्तीकलेच्या क्षेत्रात होते. आपल्या वडिलांसोबत व दोन्ही वडील बंधूंसोबत ते कार्यरत होते. फोर्टचा राजा, बल्लाळेश्वर, अंधेरीचा राजा यासह मुंबईतील अनेक नामवंत मंडळाच्या गणेश मूर्ती राजन खातू यांनी घडवल्या आहेत. त्यांनी तब्बल १५०० गणेश मूर्ती त्यांनी घडवल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here