मुंबई: आत्महत्या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (सीबीआय) दिलेल्या ताज्या माहितीच्या आधारे काँग्रेसनं मुंबई पोलिसांकडं बोट दाखवणाऱ्यांना जोरदार टोला हाणला आहे. ‘मुंबई पोलिसांचा अभिमान आहे,’ असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात संशयकल्लोळ निर्माण झाल्यानंतर भाजपसह बॉलिवूडमधील काही नटनट्यांनी व त्यांच्या चाहत्यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडं देण्याची मागणी केली होती. यापैकी काही मंडळींनी थेट मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त केला होता. त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. सर्व बाजूंनी तपास करत आहेत, असं राज्य सरकारचं म्हणणं होतं. मात्र, ते मान्य न करता काहींनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानं दिलेल्या निर्देशानंतर हे प्रकरण सीबीआयकडं सोपवण्यात आलं होतं.

वाचा:

जवळपास महिनाभराच्या तपासानंतर सीबीआयनं आज या संदर्भात अधिकृत निवेदन दिलं आहे. ‘सुशांत प्रकरणात सीबीआय अद्याप कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरू आहे,’ असं सीबीआयनं म्हटलं आहे. सीबीआयच्या याच निवेदनाचा आधार घेत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते यांनी भाजपसह मुंबई पोलिसांच्या टीकाकारांवर टीकेची झोड उठवली आहे.

‘मुंबई पोलीस दल हे जगात नावाजलेले दल आहे. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात मुंबईतील पोलिसांनी देशाला वाचवण्यासाठी जिवाची बाजी लावली होती. अशा पोलीस दलाचा अपमान करणाऱ्या व त्यांच्या प्रामाणिकपणावर संशय घेणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर आहे,’ असं सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here