मुंबईः अभिनेत्री पायल घोषहिनं चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गौरवर्तन केल्याचे आरोप केल्यानंतर कलाविश्वात खळबळ माजली होती. पायलनं अनुरागनं आऱोप केल्यानंतर रिपाइंचे अध्यक्ष यांनी दिला पाठिंबा देत अनुरागवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

पायल घोषनं एक ट्विट करत अनुरागवर गंभीर आरोप केले आहेत. अनुरागनं माझ्यासोबत असभ्य वर्तन केलं असून मला वाईट वागणूक दिली होती. या व्यक्तीवर कारावाई करा तेव्हाच या माणसाचं खरं रुप समोर येईल. या ट्विटमुळं माझ्या जीवाला धोका असून माझी मदत करा, असं म्हणत तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली होती. रामदास आठवले यांनी नुकतीच पायलची भेट घेतली आहे, तसंच, दोघांनी आज एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अनुराग कश्यपविरोधात लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

‘काही वर्षांपूर्वी पायलसोबत गैरवर्तवणूक झाली होती. याविषयी मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केलीये. अद्याप अनुरागला चौकशीसाठी बोलवण्यात आलं नाहीये. पोलिस या प्रकरणाचा तपास करताहेत. आमचा पोलिसांवर विश्वास आहे,’ असं रामदास आठवले म्हणाले.

‘ऐरवी पोलिस लगेचच कारवाई करतात. मुंबईतच आहे तरीसुद्धा अद्याप त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आलं नाही. पायल घोषनं मुंबई पोलिसांकडे सुरक्षा मागितली आहे. पायलला सुरक्षा मिळेल, याविषयी मी स्वतःहून लक्ष घालणार आहे. पायलच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास यासाठी मुंबई पोलिस जबाबदार असतील. मी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना याबाबत पत्र लिहणार आहे,’ असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

अनुरागने आरोप फेटाळले

हिनं केलेले सर्व आरोप अनुरागनं फेटाळले आहे. त्यानं ट्विट करत हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. आणखी आक्रमणं व्हायची आहेत. ही तर केवळ सुरुवात आहे. अनेकांचे फोन आले, की काही बोलू नकोस, शांत बस. हे पण माहित आहे की, माहित नाही कुठल्या दिशेनं बाण येणार आहेत’, असं अनुरागनं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here