वाचा:
कंगनाच्या बंगल्यावरील कारवाईबाबत मुंबई पालिकेच्यावतीने आज महत्त्वपूर्ण युक्तिवाद हायकोर्टात करण्यात आला. ‘कंगनाने तिच्या बंगल्यात अनधिकृत अतिरिक्त बांधकामे केली आणि मूळ बांधकामात बदल केले, ही वस्तुस्थिती आहे. तिला जेव्हा कलम ३५४-अ अन्वये नोटीस दिली तेव्हा तिने कोणतेही बांधकाम सुरू नसल्याचे उत्तर दिले. ते बांधकाम पूर्वीच केले होते असे म्हटले असते किंवा आता ते बांधकाम थांबवले आहे, असे तिने नोटिशीच्या उत्तरात म्हटले असते तर पालिकेने कलम ३५१ अन्वये कार्यवाही करून तिला सविस्तर उत्तर दाखल करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली असती. मात्र, कोणतेही बांधकाम होत नसल्याचे तिने म्हटले. त्यातच प्रत्यक्षात तपासणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना चौकातील मोकळ्या जागेत दोन शौचालयांचे बांधकाम तसेच बंगल्यात मूळ बांधकामात बदल करून अनेक बदल यासारखी अनेक कामे केल्याचे स्पष्ट दिसले होते आणि ते बांधकाम सुरू असल्याचेही दिसले म्हणूनच पालिकेने नियमानुसार कलम ३५४-अ अन्वये नोटीस बजावून २४ तासांची नोटीस दिल्यानंतर तोडकामाची कारवाई केली. त्यामुळे ती कारवाई पूर्णपणे कायदेशीरच आहे, असा युक्तिवाद मुंबई महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील यांनी मांडला.
वाचा:
संजय राऊत हे काय म्हणाले, त्यांनी काय ट्विट केले किंवा वृत्तवाहिन्यांना काय बाइट दिला त्याच्याशी पालिकेच्या कारवाईचा काहीच संबंध नाही. कायदेशीर कारवाईत काही कुहेतू आहे का, हे याचिकादाराला दाखवता आले पाहिजे. मात्र, पालिकेच्या कारवाईत कोणताही कुहेतू नाही, नियम पाळूनच कारवाई केली, असेही चिनॉय यांनी पुढे नमूद केले.
हायकोर्टाचे निरीक्षण
पालिकेच्या अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुनावणीत अनेक प्रश्न विचारल्यानंतर याचिकादाराच्या बंगल्यालगतचे बंगले व मालमत्तांवर अनधिकृत बांधकाम सुरू असल्याच्या बाबतीत तत्परतेने कारवाई झाली नसल्याचे दिसते, असे महत्त्वाचे निरीक्षण यावेळी हायकोर्टाने नोंदवले.
राऊतांच्या वकिलांना निर्देश
कंगनाच्या वकिलांनी तिचे ट्विट आणि त्यावर प्रतिक्रिया म्हणून संजय राऊत यांचे ट्विट याचा तपशील कोर्टात सादर केला. त्यानंतर संजय राऊत यांच्या वकिलांना उद्या दुपारी ३ वाजता युक्तिवाद मांडण्याचे निर्देश न्या. शाहरुख काथावाला व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी आता उद्या होणार आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times