बरेलीः सोशल मीडियावर सध्या टिकटॉकची धूम आहे. करण्यासाठी अनेक जण काहीही करायला तयार होत आहेत. खऱ्याखुऱ्या पिस्तुलासोबत टिकटॉक करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. टिकटॉक करताना पिस्तुलातून गोळी सुटल्याने या तरुणाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

बनवण्यासाठी एका १८ वर्षीय मुलाने त्याच्या आईकडे हट्ट धरला. त्यामुळे आईला नाईलाजाने कपाटात ठेवलेली पिस्तुल द्यावी लागली. टिकटॉक केल्यानंतर पिस्तूल ठेऊन देऊ, असे मुलाने आईला सांगितले होते. टिकटॉक बनवण्यासाठी आईनंही त्याला कपाटातील बंदूक दिली हातात पिस्तुल घेऊन टिकटॉक करीत असताना बंदुकीतून गोळी सुटल्याने त्याचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या या घटनेमुळे आईलाही काहीच करता आले नाही. या मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव केशव असून त्याचे वडील सैन्यातआहेत. बरेली जिल्ह्यातील भूकमपूर गावातील जवान वीरेंद्र कुमार यांच्या १८ वर्षीय मुलगा केशव कुमारचा टिकटॉक करताना मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

केशवने वडिलांची कपाटात ठेवलेली पिस्तूल आईकडे मागितली. आईने ती देण्यास नकार दिला. परंतु, केशवने हट्ट धरला. टिकटॉक करण्यासाठी पिस्तुल दे, त्या नंतर ती लगेच ठेवून देऊ. असे सांगितले. त्यामुळे आईनेही त्याला पिस्तुल दिली. केशव टिकटॉक करीत असताना चुकून पिस्तुलातून गोळी सुटल्याने त्याचा मृत्यू झाला. मुलाला पिस्तुल दिल्यानंतर केशवची आई कामात व्यस्त झाली. त्याचवेळी तिला गोळीचा आवाज आला. गोळीच्या आवाजाने त्याची आई व आजुबाजुचे लोक आले. आतमध्ये केशव रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. कानाजवळ पिस्तुल लावलेली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here