मुंबई: ‘कधी कधी काही माणसं जास्तच बोलतात. त्यातील केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री हे एक आहेत’, असा टोला काँग्रेसने आज लगावला. रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीला दिलेल्या एका सल्ल्यानंतर राष्ट्रवादीकडून ही प्रतिक्रिया आली आहे. ( Counter Attack On )

वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेसने प्रणित एनडीएसोबत येवून सरकार बनवावे, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे. त्या सल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘ज्या वर्गाच्या हिताचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारने आठवले यांना दिली आहे त्याला बगल देऊन नुसत्या कविता करण्यातच ते व्यस्त असतात आणि फुकटची प्रसिद्धी कशी मिळेल मग ते कारण काहीही असो त्याचा त्यांचा सतत प्रयत्न असते’, अशा शब्दात महेश तपासे यांनी रामदास आठवले यांच्यावर टीका केली.

वाचा:

एकीकडे मोदी सरकार हळूहळू सर्व सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करत असताना त्या कंपनीतील उपेक्षित वर्गाच्या कामगार, कर्मचारी यांच्या हिताच्या संरक्षणासाठी आपलं मंत्रालय काय करीत आहे?, असा सवालही महेश तपासे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना केला आहे. करोना व त्यानंतर निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे उद्ध्वस्त झालेल्या मागास समाजातील उद्योजक, अल्पभूधारक शेतकरी या वर्गातील लोकांसाठी आपण फक्त कविताच केली का, असा खडा सवालही महेश तपासे यांनी रामदास आठवले यांना विचारला आहे.

वाचा:

‘ आमच्यासोबत आली नाही तर राष्ट्रवादीने भाजप-रिपाइंसोबत यावं’, असं आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यांना केलं आहे. त्याचबरोबर, ‘शरद पवारांसारखा नेता एनडीएमध्ये आल्यानंतर नरेंद्र मोदी यांना त्यांची साथ मिळेल आणि देशाच्या विकासासाठी फायदा होईल,’ असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीने सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. या वादळातच रामदास आठवले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना सल्ला दिला आहे. शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपसोबत यायला हवं. तसं झालं नाही तर मग राष्ट्रवादी काँग्रेसने ते पाऊल उचलायला हवं. शरद पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आल्यास चित्र बदलून जाईल. राज्यात त्यांचा पक्ष भाजपसोबत सत्तेत असेल आणि केंद्रातही पवार यांना महत्त्वाचं पद मिळेल, असं विधान आठवले यांनी आज केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here