मुंबई इंडियन्सला सोमवारच्या सामन्यात आरसीबीने सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. आरसीबीच्या या विजयानंतर गुणतालिकेमध्ये मोठा बदल झालेला पाहायला मिळाला. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्स आणि आरसीबीचे गुतालिकेतील स्थान नेमके काय आहे, पाहा…

या सामन्यापूर्वी आरसीबीचा संघ हा सातव्या क्रमांकावर होता. कारण गेल्या सामन्यात आरसीबीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यापूर्वी फक्त एकच विजय मिळाल्यामुळे आरसीबी हा सातव्या स्थानावर होता. पण या विजयानंतर आरसीबीने थेट तिसऱ्या स्थानावर धडक मारली आहे. कारण या विजयानंतर आरसीबीचे चार गुण झाले असून त्यांनी तिसरे स्थान पटकावले आहे.

मुंबईने गेल्या सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर होता. पण या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आतापर्यंतच्या तीन सामन्यांमध्ये मुंबईला दोन पराभवांचा सामना करावा लागला असून त्यांच्या नावावर फक्त एक विजय आहे. आरसीबीने विजय मिळवल्यावर चौथ्या क्रमांकावर असलेल्या मुंबईच्या संघाची घसरण झाली आहे. मुंबईचा संघ आता पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

या गुणतालिकेमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. त्याचबरोबर रविवारी अविस्मरणीय विजय साकारणाऱ्या राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. तिसऱ्या स्थानावर आता आरसीबीचा संघ असून चौथ्या स्थानावर किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ आहे.

आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सुपर ओव्हरचा सामनाही चांगलाच रंगला. पण या सुपर ओव्हरमध्ये आरसीबीने मुंबईवर बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. मुंबईने सुपर ओव्हरमध्ये आरसीबीपुढे आठ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आरसीबीकडून कर्णधार विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स उतरले होते. सुपर ओव्हरमध्ये अखेरच्या चेंडूंवर आरसीबीला जिंकायला एका धावेची गरज होती. कोहलीने यावेळी चौकार लगावला आणि संघाला सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला.

सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना मुंबईला सात धावा करता आल्या. या सात धावा करताना मुबंईला किरॉन पोलार्डची विकेट गमवावी लागली. त्यामुळे आरसीबीपुढे विजयासाठी आठ धावांची गरज होती. आरसीबीचा युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने यावेळी भेदक गोलंदाजी करत मुंबईच्या संघाला फक्त सात धावा दिल्या आणि पोलार्डचा विकेटही मिळवला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here