वाचा:
उपचाराची व्यवस्था नसल्याने अनेक रुग्ण हे पुण्यात दाखल होत आहेत. हे प्रमाण सुमारे ३० टक्के आहे. त्यामुळे होणारा ताण कमी करण्यासाठी या चार जिल्ह्यांमध्ये जम्बो सेंटर उभारण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
राव म्हणाले, ‘सांगलीतील क्रीडा संकुलावर ११० ऑक्सिजनयुक्त आणि ५० आयसीयू खाटांची व्यवस्था असणारे तात्पुरते करोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी खाटांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यासाठी कराड येथे जम्बो सेंटर सुरू करण्यात येणार आहे. कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातही जम्बो सेंटर उभारण्यात येणार आहे. पाच ऑक्टोबरपर्यंत चारही जिल्ह्यांमध्ये जम्बो सेंटर सुरू होणार आहेत.’
वाचा:
‘या चार जिल्ह्यांमध्ये जम्बो सेंटर सुरू झाल्यानंतर या जिल्ह्यांतील रुग्णांची उपचाराची व्यवस्था होणार आहे. त्यामुळे पुण्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होऊ शकणार आहे’ असे राव यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या चार जिल्ह्यांमध्ये बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. साताऱ्यामध्ये ४३ हजार ६०९, सोलापूरमध्ये ३१ हजार ८१२, सांगलीत ३३ हजार ४४७ आणि कोल्हापूरमध्ये ४३ हजार ३४ रुग्ण आहेत. त्यापैकी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची संख्या सुमारे ३३ हजार आहे. त्यामुळे खाटांच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चार जम्बो सेंटर उभे राहिल्यानंतर संबंधित रुग्णांची जिल्ह्यांमध्येच व्यवस्था होणार आहे. त्यामुळे पुण्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होऊ शकणार आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times