नाल्यांमधील अतिक्रमणे काढून संरक्षण भिंती बांधण्याबाबत यापूर्वी पुणे शहर तहसीलदार कार्यालयाकडून पुणे महापालिकेला पत्र पाठविण्यात आली आहेत. आता अनधिकृत वास्तव्य करत असलेल्या कुटुंबांचे स्थलांतर करण्याची सूचना करण्यात आली आहे.
याबाबत पुणे शहर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील त्या म्हणाल्या, ‘नाल्यांमधील अतिक्रमण काढणे, राडारोडा हटविणे आणि संरक्षक भिंती बांधणे याबाबत यापूर्वीच पुणे महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आंबिल ओढा परिसरातील अनधिकृत वास्तव्य करत असलेल्या कुटुंबांना गेल्या वर्षीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून तत्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन महापालिकेला करण्यात आले आहे’
‘गेल्या वर्षी २५ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमध्ये पुणे शहर तहसील कार्यालयाच्या क्षेत्रातील ४६५५ कुटुंबे बाधित झाली होती. त्यामध्ये टांगेवाला सोसायटी आणि परिसरातील सात व्यक्तींचा मृत्यू झाला होता. या कुटुंबांना राज्य सरकारकडून प्रति कुटुंब १५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच मृत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे’ असे कोलते पाटील यांनी स्पष्ट केले.
‘अधिकृत घरांचे नुकसान झाल्याने सानुग्रह अनुदानापोटी २४ कुटुंबांना प्रत्येकी सहा हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे’ असे त्यांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times