म. टा. प्रतिनिधी, : नवले पुलाजवळ एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने पुण्यात खळबळ माजली आहे. तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरला होता. तरुणाचे हायपाय बांधलेले होते. तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस नियंत्रण कक्षाला नवले पुलाजवळ एका गोणीत मृतदेह आढळून आल्याचा फोन आला. त्यांनी ही माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना दिली. त्यानंतर मार्शल आणि रात्र गस्तीवरील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना एका गोणीत तरुणाचा मृतदेह आढळला. त्याचा खून केल्यानंतर हातपाय दोरीने बांधून मृतदेह गोणीत टाकल्याचे आढळून आले.

आणखी बातम्या वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here