मुंबई: अभिनेता यांच्या मृत्यू प्रकरणी ‘एम्स’नं दिलेल्या अहवालानंतर काँग्रेसनं भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. ‘भारतीय जनता पक्षाचं तोंड काळं होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे,’ अशी बोचरी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते यांनी केली आहे.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआयने एम्सच्या डॉक्टरांची समिती स्थापन केली होती. या समितीने मुंबईतील कूपर हॉस्पिटलने दिलेला पोस्टमॉर्टम रिपोर्ट तपासला. त्यानंतर एम्सच्या डॉक्टरांनी सोमवारी अंतिम अहवाल सीबीआयला सादर केला. त्यात बऱ्याच गोष्टी आहेत. सुशांतचा खून झाल्याचं यातून निष्पन्न होत नसल्याचं एम्सच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

एम्सच्या याच अहवालाच्या अनुषंगानं सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. मुंबई पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासावर व राज्य सरकारच्या भूमिकेवर संशय उपस्थित करत भाजपनं सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडं देण्याचा आग्रह धरला होता. त्यासाठी भाजपनं केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत संपर्क साधला होता. सुशांतच्या प्रकरणात घातपाताची कुठलीही शक्यता दिसत नसल्याचं आता ‘एम्स’नं स्पष्ट केल्यानं काँग्रेस आक्रमक झाली आहे.

‘एम्सच्या अहवालामुळं भाजपचं तोंड पुरतं काळं झालं आहे. भाजपच्या कटकारस्थानांचा पर्दाफाश झाला आहे. गुप्तेश्वर पांडे यांना उगाच स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली नाही,’ असा टोला सचिन सावंत यांनी हाणला आहे. ‘मुंबई पोलिसांना ज्या वाईट पद्धतीनं बदनाम करण्यात आलं, महाराष्ट्राचा अपमान केला गेला. ते पाहता महाराष्ट्राची जनता भाजपला माफ करणार नाही. सुशांतच्या मृत्यूचं राजकारण करण्याचं पाप भाजपला महागात पडेल,’ असं सावंत यांनी म्हटलं आहे.

वाचा:

‘मोदी सरकारचं देश पातळीवरचं अपयश लपवण्यासाठी सुशांत प्रकरणात एक षडयंत्र रचलं गेलं. राजकीय काटकारस्थान करून तीन तपास संस्थांना महाराष्ट्रात आणलं गेलं. संघराज्य चौकटीच्या चिंधड्या उडवल्या गेल्या. राजकारणासाठी बिहार पोलिसांचा वापर केला गेला. मोदी सरकार पुरस्कृत ‘गोदी मीडिया ट्रायल’चा आम्ही निषेध करतो,’ असं सावंत यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here