कोल्हापूर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले व यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळं इतर समाजाचे नेतेही सावध झाले आहेत. ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आज संभाजीराजेंची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचा शब्द दिला.

मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर जातनिहाय आरक्षण रद्द करून गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी अलीकडंच मांडली होती. त्यावर ओबीसी समाजाच्या व अन्य नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रियाही आल्या होत्या. तर, संभाजीराजे यांनी आरक्षणासाठी अधिक आक्रमक होण्याची भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते व अन्य नेत्यांनी संभाजीराजेंची भेट घेतली.

वाचा:

संभाजीराजे भोसले यांनी या भेटीची माहिती देणारा व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. ‘शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीजमातींना, बारा बलुतेदारांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला १९०२ मध्ये जे आरक्षण दिलं. त्यात अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. बहुजन समाज कसा एकत्र आणता येईल हाच माझा प्रयत्न आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा इतर समाजाला विश्वासात घेऊन सोडवला जावा अशी माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे. बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी २००७ साली जेव्हा बाहेर पडलो, तेव्हापासून माझी हीच भूमिका आहे,’ असं संभाजीराजे म्हणाले.

‘हरीभाऊ राठोड व अन्य नेते मला भेटायला आले याचा मला आनंद आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच त्यांचीही भूमिका आहे. शिवाजी महाराजांची, शाहू महाराजांची भूमिका रास्त आहे. यातून कसा मार्ग काढता येईल यासाठी ते आले होते. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देता येईल, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करतो,’ असं संभाजीराजे म्हणाले. ‘लवकरात लवकर पुन्हा एकदा सर्व समाजातील लोक एकत्र बसून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू,’ असंही संभाजीराजेंनी सांगितलं.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here