मुंबईः मुंबई पोलिस आणि मुंबईवर केलेल्या वक्तव्यानंतर अभिनेत्री कंगना राणावतनं पुन्हा एकदा मुंबई आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईत गुंडाराज सुरू असल्याचा आरोप तिनं केला आहे.

मुंबई पोलिस आणि मुंबईवर टीका केल्यानंतर अभिनेत्री कंगना राणवतला मुंबईत भीती वाटत असेल तर स्वतःच्या राज्यात जा, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला होता. तेव्हापासून कंगना आणि शिवसेनेत सामना रंगला आहे. कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेनं कारवाई केल्यानंतर हा वाद आणखीनच चिघळला. आपल्या बंगल्यावरील कारवाई बेकायदेशीर असल्याचं सांगत कंगनानं कोर्टात धाव घेतली आहे. त्यानंतर सातत्याने कंगना महाराष्ट्र सरकारवर टीका करत आहे,

‘महाराष्ट्र सरकारवर टीका करणाऱ्या युट्यूबर साहिल चौधरीला अटक केल्यानंतर कंगनानं ठाकरे सरकारवर आरोपाच्या फैरी झाडल्या आहेत. मुंबईत गुंडाराज सुरू आहे का? जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या टीमला कोणी प्रश्न विचारू शकत नाही का? ते आमच्यासोबत काय करू शकतील? आमचं घर तोडतील का आम्हाला मारतील? याचं उत्तर कोण देणार?’ असा सवाल कंगनानं काँग्रेसला केला आहे.

‘महाराष्ट्र सरकारच्या कामावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या साहिलविरोधात कोणीतरी तक्रार दाखल करतं आणि त्याला लगेच अटक होते पण अनुराग कश्यपविरोधात पायल घोषनं दाखल केलेल्या तक्रारीला बरेच दिवस झाल्यानंतरही अनुराग कश्यप मोकाट फिरतोय. काय आहे हे सगळं? असा सवाल कंगनानं उपस्थित केलाय.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here