सय्यद नुरअली अहमदअली (वय ३६, रा.गेंदालाल मिल) यांनी त्यांच्या मालकीच्या ट्रकमध्ये सोमवारी दुपारी सुप्रीम इंडस्ट्रीजमध्ये येऊन साडेसात टन वजनाचे पाइप भरले होते. मंगळवारी सकाळी हे पाइप घेऊन त्यांना बंगळूरूला जायचे होते. दरम्यान, दुपारी चार वाजता त्यांनी सुप्रीम कॉलनीत राहणाऱ्या क्लिनर असलम खान याच्या घरासमोर ट्रक उभा केला. यानंतर ते घरी निघून गेले. मंगळवारी पहाटे तीन वाजता माथेफिरुने हा . ट्रकमध्ये प्लास्टिक पाइप असल्यामुळे काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले होते. सुमारे ३०-३५ फूट उंचीपर्यंत आगीचे लोळ पसरले होते. हे दृष्य पाहून ट्रक ज्या ठिकाणी लावला होता, तेथील शेजारी राहणारे लोक जागे झाले. आगीचे रौद्ररूप पाहून त्यांच्यात गोंधळ झाला. संपूर्ण अपार्टमेंटमध्ये पळापळ सुरू झाली होती. लहान मुले, वृद्धांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आले. तसेच किचनमधील गॅस सिलिंडर काढून सुरक्षित ठीकाणी ठेवले.
आगीमुळे निर्माण झालेल्या उष्णतेने अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील एका घराच्या खिडकीची काच देखील फुटली. यामुळे नागरिक अधिकच घाबरले. सव्वातीन वाजता अग्निशमन दलाचा पहिला बंब घटनास्थळी पोहोचला. यानंतर तासाभरात आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. परंतु, या आगीत ट्रक व पाइप पूर्णपणे जळून खाक झाले. चार लाख रुपये किंमतीचा ट्रक आणि त्यामधील ९ लाख रुपये किंमतीचे पाइप असे एकूण १३ लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबत ट्रक मालक सय्यद यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times