मुंबईः ‘सामना’च्या निमित्तानं नेहमी राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेणाऱ्या शिवसेना नेते यांनाच स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं मुलाखतीसाठी निमंत्रण दिलं आहे. आता कुणाल कामरानं दिलेली ही ऑफर संजय राऊत स्वीकारणार का? असा प्रश्न सध्या रंगत आहेत.

संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार असल्याचं जाहीर केल्यापासून राज्यात ही एकच चर्चा रंगताना दिसतेय. दैनिक सामनाच्या मुलाखतीसाठी नुकतीच राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांच्यात तब्बल दोन ते तीन तास चर्चा रंगली होती. राऊत-फडणवीस यांच्या या भेटीनंतर मोठा गदारोळ माजला होता. त्यानंतरच, कुणाल कामरानं संजय राऊत यांची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळं सर्वानीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.

‘संजय राऊत सरांनी शटअप या कुणाल या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी ते पुन्हा सुरु करेन, अन्यथा शक्यता कमी आहे, असं ट्विट कुणाल कामरानं केलं आहे. आता संजय राऊत कुणाल कामराच्या या ट्विटचा विचार करून त्याच्या कार्यक्रमात सहभागी होणार का हे पाहण, उत्सुकतेचं ठरणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here