मुंबई:
परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून आलेल्या नैराश्येतून येथे एका १३ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी पहाटे ही घटना घडली. ही मुलगी आपल्या आई वडील आणि बहिणी समवेत डोंबिवली पश्चिमेकडे राहत होती. वडील व्यावसायिक असून आई नामांकित रुग्णालयात परिचारिका आहे. मोठ्या बहिणीप्रमाणे चांगले मार्क्स मिळावेत अशी आई वडिलांची अपेक्षा होती मात्र सहामाही परीक्षेत कमी मार्क्स मिळाल्याने आईने अभ्यास करण्यास सांगितले.

मंगळवारी तिला वडिलांनी तिला पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अभ्यास करण्यासाठी उठवले. ती अभ्यास करण्यासाठी स्टडी रुममध्ये गेली मात्र तासभर कसलाही आवाज नसल्यामुळे वडिलांनी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दरवाजा उघडून पाहिले असता तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. लाडक्या लेकीच्या जाण्याने आई-वडिलांना धक्का बसला आहे. याप्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here