मुंबईः राज्यात सातत्याने वाढणारी करोना रुग्णांची संख्या वाढत असताना आजची आकडेवारी दिलासादायक देणारी ठरली आहे. आजही गेल्या करोना रुग्णांपेक्षा करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यातील ही स्थिती समाधान देणारी असली तरी करोनामृतांचा आकडा मात्र चिंता वाढवणारा आहे. आज राज्यात ४३० जणांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून २० हजारांच्या घरात करोना रुग्ण सापडत होते. राज्याचे आरोग्य विभागानं जारी केलेल्या आजच्या आकडीवारीनुसार गेल्या २४ तासांत हा आकडा कमी झाला असून आज १४ हजार ९७६ रुग्ण सापडले आहे. त्यामुळं करोना रुग्णांची संख्या १३ लाख ६६ हजार १२९ इतकी झाली आहे. तर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६६ लाख ९८ हजार ०२४ चाचण्यांपैकी १३ लाख ६६ हजार १२९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात मोठ्या संख्येनं करोना रुग्ण घरी बरे होऊन घरी परतत आहेत. आज तब्बल १९ हजार २१२ जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यात आत्तापर्यंत १० लाख ६९ हजार १५९ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७८. २६ टक्के झाले आहे.

राज्यात आज ४३० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यात एकूण करोनामृतांचा आकडा ३६ हजार १८१ इतका झाला आहे. सध्या राज्यात २.६५ टक्के इतका झाला आहे. त्यातबरोबर राज्यात २ लाख ६० हजार ३६३ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here