फिरोझपूर:
पंजाबमधील येथे भारत-पाकिस्तान सीमेनजीक सीमा सुरक्षा दलाच्या () जवानांना ड्रोन सदृश गोष्ट आकाशात फिरताना दिसल्याने जवानांनी त्या दिशेने गोळीबार केला. शमेके सीमा पोस्टजवळ तेंडीवाला गावात ही जवानांच्या निदर्शनास आली. सोमवारी रात्री ८.४८ वाजता आणि रात्री ११ वाजता असे दोन वेळा जवानांनी आकाशात ड्रोन सारखी दिसणारी गोष्ट पाहिली. त्यानंतर जवानांनी त्या दिशेने गोळीबार केला. हे १३६ बटालियनचे जवान होते. त्यांनी ती वस्तू खाली पाडली. मात्र पडलेले अवशेष सापडले नाहीत. बीएसएफ आणि पोलिसांनी संयुक्तपणे हे अवशेष शोधण्यासाठी मोहिम हाती घेतली होती. पण ते सापडले नाहीत.

सीमा सुरक्षा दलाचे उपमहानिरीक्षक संदीप चनन यांनी सांगितले की आकाशात ड्रोनसदृश काहीतरी उडताना दिसले. मात्र ते ड्रोनच होते का यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. ‘काही ड्रोन्स आकाशात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे कारवाई केली,’ अशी माहिती पोलीस अधीक्षक बलजीत सिंह सिद्धू यांनी दिली.

काही संशयास्पद आढळल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन गावकऱ्यांना केले असल्याचेही सिद्धू यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here