पंढरपूर: एका बाजूला बड्या बड्या उद्योगपतींची कर्जे केंद्र सरकार माफ करीत असताना करोनाच्या संकटात आर्थिक कोंडीत सापडलेल्या महिलांची कर्जे का माफ होत नाहीत, असा सवाल करीत आज येथे शेकडो महिलांनी महामोर्चा काढत एल्गार पुकारला. ( Against Companies In Pandharpur )

वाचा:

प्रदेश सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली बचत गटांच्या शेकडो महिला सदस्यांनी शिवाजी चौकातून पंढरपूर तहसील कार्यालयावर हा विराट मोर्चा काढला. पंढरपूरच्या तहसीलदारांना कर्जमाफी संदर्भात निवेदन देण्यात आलं आणि हा मोर्चा समाप्त करण्यात आला.

कर्जाच्या तणावाखाली असलेल्या बचत गटाच्या काही महिला भगिनींनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला असून मोर्चाला झालेल्या मोठ्या गर्दीतून महिलांच्या मनातील खदखदच बाहेर आली आहे. सदस्य असलेल्या अनेक महिलांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जे घेतली मात्र नंतर लॉकडाऊन सुरू झाल्याने त्यांचा या पैशातून खरेदी केलेला माल खराब झाला व मोठा आर्थिक फटका बसला. वास्तविक ही अचानक आलेली आपत्ती असल्याने याचा कोणालाच अंदाज नव्हता. या स्थितीत आमच्यावर खूप मोठं आर्थिक संकट कोसळलं असून मायक्रो फायनान्सची कर्जे माफ झाल्यास आम्हाला दिलासा मिळेल, अशी भावना मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केली.

वाचा:

मनसेच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला या मोर्चाला मोठी गर्दी झाली होती. करोनाच्या अनुषंगाने असलेले निर्बंध झुगारून महिला या मोर्चात उतरल्या. मास्क लावून महिला मोर्चात सहभागी झाल्या असल्या तरी सामाजिक अंतर मात्र पाळले गेले नाही. करोना काळातील राज्यातील हा सर्वात मोठा मोर्चा असल्याचे बोलले जात आहे. मोर्चाच्या वतीने शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन दिले व मायक्रो फायनान्स कंपन्यांना आवर घालण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चाला मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, सिद्धेश्वर गरड, निकिता पवार, रंजना इंगोले, पूजास लावंगकर, महेश पवार, सागर घोडके, प्रताप भोसले, प्रथमेश पवार, अनविता गायकवाड, प्रशांत इंगळे, जैनुद्दीन शेख, अमर कुलकर्णी, अमोल झाडगे, अप्पा करचे, सतीश दिडवाघ, अनिल केदार, बालाजी वाघ, दिलीप पाचंगे, दीपाली थोरात, नागेश इंगोले असे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here