यांची आज सकाळी करोना चाचणी करण्यात आली होती. चाचणीत ते करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. नायडू यांच्या करोनाची कुठलीही लक्षणं दिसून आली नाहीत. सध्या नायडू यांची प्रकृती चांगली आहे. त्यांना डॉक्टरांनी क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिला आहे. नायडू यांची पत्नी उशा नायडू यांचीही करोना चाचणी केली गेली होती. पण त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्या सध्या आयसोलेशनमध्ये आहेत, उपराष्ट्रपाती कार्यालयाने ट्विट करून ही माहिती दिलीय.
उपराष्ट्रपतींच्या सचिवालयाकडून करोनासंदर्भात काही तासांपूर्वी ट्विट केलं गेलं होतं. करोना पॉझिटिव्ह रुग्णांशी भेदभाव आणि गैरवर्तन करू नका. तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही अशी कुठल्याही प्रकारची वाईट वागणूक देऊ नका. आपण करोना रुग्णांचा सहानुभूती विचार केला पाहिजे, असं आवाहन उपराष्ट्रपतींच्या सचिवालयाकडून करण्यात आलं होतं. या ट्विटनंतर काही तासांनी सचिवालयाने व्यंकय्या नायडू हे करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती ट्विट करून दिली.
यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नितीन गडकरी यांच्यासह काही मंत्रीही करोना पॉझिटिव्ह आढळून आले. अमित शहा आता करोनामुक्त झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच संसदेचं अधिवेशन झालं. या अधिवेशनात २४ हून अधिक खासदार करोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. करोना व्हायरच्या संसर्ग वाढत असल्याने संसदेचं अधिवेशन वेळे आधीच गुंडाळण्यात आलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times