पुणे: प्रतिभावान अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ( ) अध्यक्षपदी मंगळवारी नियुक्ती झाली. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाने कपूर यांच्या नियुक्तीची घोषणा केली. कपूर हे ३ मार्च २०२३ पर्यंत एफटीआयआयचे अध्यक्ष असतील. ( Appointed President Of FTII )

वाचा:

एफटीआयआयचे अध्यक्ष म्हणून निर्माते यांची मुदत ३ मार्च रोजी संपल्यानंतर करोना काळात नियुक्ती प्रक्रिया टाळण्यासाठी सिंह यांच्या नियुक्तीला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. अखेर मंगळवारी पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून शेखर कपूर यांची नियुक्ती करण्यात आली. कपूर यांच्या नियुक्तीनंतर आता केंद्र सरकारतर्फे एफटीआयआयचे सोसायटी सदस्य म्हणून कला क्षेत्रातील व्यक्तींची निवड केली जाईल. सोसायटी स्थापनेनंतर त्यातून नियामक मंडळ आकारास येईल.

वाचा:

अभिनेते यांची नियुक्ती केल्यापासून एफटीआयआयचे अध्यक्षपद चर्चेत आहे. चौहान यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हरहुन्नरी अभिनेते यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. खेर यांच्या नियुक्तीने विरोध थांबला. खेर यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये तडकाफडकी पदाचा राजीनामा दिल्यानंतर सीआयडी मालिकेचे दिग्दर्शक व निर्माते तसेच एफटीआयआयचे पदाधिकारी ब्रिजेंद्र पाल सिंह (बी. पी. सिंह) यांची डिसेंबर २०१८ मध्ये अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सिंह यांच्या कार्यकाळात एफटीआयआयने ठिकठिकाणी लघुअभ्यासक्रम सुरू केल्याने खासगीकरणाच्या चर्चेने जोर धरला होता. शुल्कवाढ तसेच लघुअभ्यासक्रमांसाठी हजारो रुपये आकारण्यावरून टीका होत होती. सिंह यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता होती.

वाचा:

शिक्षण प्रक्रिया सुरू करण्याचे आव्हान

करोनामुळे एफटीआयआयमधील शिक्षण प्रक्रिया आणि कार्यालयीन व्यवहार बंद झाल्याने नवीन अध्यक्षांसाठी प्रक्रिया करण्याचे केंद्र सरकारने टाळले. सरकारने नवीन व्यक्तीच्या नियुक्तीऐवजी बी. पी. सिंह यांना मार्चनंतर दोन वेळा मुदतवाढ दिली. अखेर सात महिन्यानंतर अध्यक्षपदासाठी शेखर कपूर यांची नियुक्ती झाली आहे. करोनामुळे ठप्प असलेली एफटीआयआयमधील शिक्षणप्रक्रिया कशी सुरू करायची हे आव्हान आता शेखर कपूर यांच्यापुढे आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धतीवर विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी फुली मारली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here