नवी दिल्लीः करोनावरील लस सर्व भारतीयांना देण्यासाठी ८० हजार कोटींच्या खर्चाच्या अंदाजावर सहमत नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी नुकत्याच ट्विट त्यांनी उत्तर दिलंय. सर्व भारतीयांना करोन व्हायरस लस देण्यासाठी इतका जास्त खर्च लागणार नाही. अपेक्षित खर्चाची तयारी सरकारने करून ठेवली आहे, असं भूषण यांनी सांगितलं.

सीरम इन्स्टिट्यूटच्या पुनावालांचा काय होता सवाल?

पुण्यातल्या जगातील सर्वात मोठी लस उत्पादक ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी २६ सप्टेंबरला पीएमओ इंडियाला टॅग करत प्रश्न केला होता. ‘भारत सरकारकडे पुढील वर्षापर्यंत ८०,००० कोटी रुपये उपलब्ध होतील? कारण लस विकत घेण्यासाठी आणि प्रत्येक भारतीयाला देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाला इतक्या निधीची आवश्यकता असेल. आता आपल्यापुढे हे पुढील आव्हान आहे आणि त्याला सामोरं जावं लागेल’, असं अदर पुनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

पुनावाला यांच्या ट्विटशी संबंधित प्रश्नावर भूषण यांनी उत्तर दिलं. ‘आम्ही ८० हजार कोटी रुपयांच्या अंदाजाशी सहमत नाही. सरकारने लस तज्ञांची एक राष्ट्रीय समिती नेमली आहे. आतापर्यंत या समितीच्या ५ बैठका झाल्या आहेत, अशी माहिती भूषण यांनी दिली.

या बैठकांमध्ये करोना लसीची वितरण प्रक्रिया आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चावर चर्चा केली आहे. प्रथम कुणाला लस द्यावी, याचा आम्ही विचार केला आहे. यासाठी आवश्यक असलेली रक्कम सरकारकडे उपलब्ध आहे. आम्ही बैठकीत याचा अंदाज घेतला आहे, असं भूषण म्हणाले.

लस किती रुपयांन उपलब्ध होणार?

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्राझेनेकाबरोबर सीरम इन्स्टिट्यूटने भागीदारी केली आहे. भारतासह जगभरातील अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ३ अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास ६०० रुपयांना करोना लस उपलब्ध करून देऊ, असं सीरम इन्स्टिट्यूटने म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here