पुणे: गणेशोत्सवामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याने शहरात बाधित रुग्णांची संख्याही वाढल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सवात नागरिक घराबाहेर पडू नयेत, यासाठी बंधने घालण्यात येणार असल्याचे सूतोवाच प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. नागरिकांनी या काळात काळजी न घेतल्यास पुन्हा करोनाचा प्रसार वाढण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. ( Briefs Media On )

वाचा:

विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिकेचे आयुक्त यांनी पत्रकार परिषदेत याबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले. राव म्हणाले, ‘गणेशोत्सवापर्यंत दररोज करोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, झाल्यानंतर बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. १७ सप्टेंबरपर्यंत रुग्णसंख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आगामी काळात नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. नवरात्रोत्सवानंतर दसरा आणि दिवाळी हे सणदेखील येत आहेत. या काळातही नागरिकांनी शक्यतो घराबाहेर न पडता खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.’

वाचा:

‘शहरासह जिल्ह्यात गेल्या सात दिवसांत दररोजच्या चाचण्यांच्या तुलनेत बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण ३० टक्क्यांवरून २४ टक्क्यांवर आले आहे. बाधित रुग्णांच्या तुलनेत दररोज उपचारांनंतर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे’, असे राव यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवानंतर बाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. उत्सवाच्या काळात नागरिक हे घराबाहेर पडल्याने या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या करोनाचा प्रार्दुभाव कमी झाला आहे. त्यामुळे आगामी. नवरात्रोत्सवात नागरिकांनी काळजी न घेतल्यास पुन्हा करोनाचा प्रसार वाढण्याची भीती आहे,’ असे विक्रम कुमार यांनी सांगितले.

वाचा:

‘शहरात गणेशोत्सवापासून १७ सप्टेंबरपर्यंत दररोज सुमारे १९०० बाधित रुग्ण आढळून येत होते. १८ ते २६ सप्टेंबर या कालावधीत हे प्रमाण सुमारे १७०० झाले आहे. सध्या दररोज १४०० ते १५०० बाधित रुग्ण सापडत आहेत. खाटा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडे सरासरी ३०० दूरध्वनी येत होते. आता बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने खाटा मिळण्यासाठी दररोज सुमारे १२५ दूरध्वनी येत आहेत,’ असेही विक्रम कुमार म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here