पीडितेचे कुटुंबीय दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयाच्या बाहेर धरणे आंदोलनाला बसलं होता. पण इथूनही पोलिसांनी त्यांना सोबत नेलं. पीडितेचे कुटुंबीय सफदरजंग रुग्णालयावरही आरोप करत आहे. पोस्टमॉर्टम झाले आहे. पण मृतदेह आमच्याकडे सोपवण्यात आलेला नाही. आम्हाला कोणताही रिपोर्टही देण्यात आलेला नाही, असं तिच्या भावाने सांगितलं.
एफआयआरसाठी आम्हाला ८-१० दिवस वाट पाहावी लागली. गुन्हा दाखल केल्यानंतरही पोलिस एका आरोपीला पकडत होते आणि दुसर्याला सोडत होते. धरणे आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली. पोलिसांनी आरोपींना १०-१२ दिवसांनी अटक केली, असं पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
बहीण जमिनीवर पडली होती. तरीही पोलिसांनी तिच्यासाठी पोलिसांनी अॅम्ब्युलन्स बोलवली नाही. उलट तिला इथून घेऊन जा. ती बहाणे करतेय, असं पोलीस म्हणत होते. दीदीचे रक्तस्त्राव १० ते १५ दिवस थांबला नाही. २२ सप्टेंबरनंतर तिला चांगला उपचार मिळू लागला. तिच्याबाबत पोलिस आणि प्रशासनाने हलगर्जीपणा केला. तिच्यावर योग्य उपचार केले गेले नाहीत, असं पीडितेचा भाऊ म्हणाला.
आपल्या बहिणीला सामान्य वॉर्डात ठेवण्यात आलं होतं. आम्हाला उत्तर प्रदेश सरकारकडून न्यायाची कुठलीही अपेक्षा राहिलेली नाही. भाजप सरकार या घटनेवर काहीही बोललेलं नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही काहीच बोलले नाहीत, असं पीडितेचे भाऊ म्हणाले. आम्हाला न्याय हवा आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवीय, असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
अलिगढच्या डॉक्टरांने काय सांगितलं
पीडित मुलीला अलिगढच्या जेएन मेडिकल कॉलेजमधून दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये रेफर केलं गेलं. अलिगढ मुस्लि विद्यापीठाच्या जेएन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या डॉ. एम एफ हुड्डा यांनी या प्रकरणी माहिती दिली. पीडित तरुणीला १४ सप्टेंबरला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. तिचा मणका तुटला होता. यामुळे संपूर्ण शरिराला लकव्याचा झटका बसला होता. पीडित तरुणी त्यावेळी बेशुद्ध होती. तिला आयसीयूत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आम्ही तिच्यावर शक्य ते सर्व उपचार करत होतो, असं डॉक्टर म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times