म. टा. प्रतिनिधी, : पतीचा फावड्याने मारून निर्घृणपणे खून केल्याप्रकरणी संशयित पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार मंगळवारी (२९ सप्टेंबर) सकाळी सहा वाजता भैरवनाथ मंदिराजवळ, गावात घडला आहे. मयूर गायकवाड (वय २८, रा. मामुर्डीगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याची पत्नी रितू मयूर गायकवाड हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर बिगारी काम करत होता. दीड वर्षापूर्वी मयूर आणि रितू यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना मूलबाळ नाही. दरम्यानच्या काळात दोघांमध्ये सतत भांडण होत होते. रितू काही वेळेला घरातून निघूनही गेली होती. सोमवारी दुपारीही रितू घरातून निघून गेली. मयूरचा भाऊ आणि आई दोघे एका रुग्णालयात काम करतात. सोमवारी रात्री दोघांची रात्रपाळी होती. त्यामुळे सोमवारी सायंकाळी दोघेही कामावर निघून गेले. त्या वेळी मयूर घरी एकटाच होता. रात्री रितू घरी परत आली. घरात ते दोघेच झोपले होते. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास मयूरच्या डोक्यात फावड्याने मारून त्याचा खून करण्यात आला. घरात मयूर आणि त्याची पत्नीच असल्याने पोलिसांनी पत्नी रितूला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

रुग्णालयात तोडफोड
बेशुद्ध अवस्थेत आणलेल्या एका रुग्णाचा तपासणीपूर्वीच मृत्यू झालेला असल्याचे डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाइकांना कळविल्यानंतर त्यांनी रुग्णालयात गोंधळ घालून तोडफोड केली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाणही केली. ही घटना रविवारी (२७ सप्टेंबर) रात्री साडेसात वाजता एन. आर. एस. हॉस्पिटल, काळेवाडी फाटा, वाकड येथे घडली.

डॉ. नारायण सुरवसे (वय ४६, रा. वाकड) यांनी या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी करीम शेख, मुख्तार शेख व त्यांच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्यांच्या अन्य १० ते १५ साथीदारांनी मिळून सलीम शेख या व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत काळेवाडी फाटा येथील एनआरएस हॉस्पिटलमध्ये आणले. सलीम शेख यांचा डॉक्टरांच्या तपासणीपूर्वी मृत्यू झाला होता. त्याबाबत डॉक्टरांनी सोबतच्या नातेवाइकांना कळवले. यावरून नातेवाइक करीम शेख, मुख्तार शेख आणि त्यांच्यासोबतच्या दोन व्यक्तींनी हॉस्पिटलमध्ये मोठमोठ्याने आरडाओरडा, शिवीगाळ करून दहशतीचे वातावरण निर्माण केले. हॉस्पिटलचे सुरक्षारक्षक, परिचारिका आणि सफाई कामगारांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. आरोपींनी हॉस्पिटलमध्ये घुसून ईसीजी मशिन फोडून तीन लाख रुपयांचे नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here