म. टा. प्रतिनिधी, : प्रियकराने साथीदारांच्या मदतीने १५ वर्षीय प्रेयसीवर सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना जरीपटका भागात उघडकीस आली. जरीपटका पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून प्रियकरासह चौघांना अटक केली आहे. प्रियकर यश मेश्राम, अमित बोलके, अभिनेश देशभ्रतार व ऋतिक मोहरले, अशी अटकेतील नराधमांची नावे आहेत.

पीडित १५ वर्षीय मुलगी दहाव्या वर्गात शिकते. यश मेश्राम याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. २५ ऑगस्टला यशने तिला नारा परिसरात नेले. झुडुपात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याच वेळी अभिनेश देशभ्रतार, अमित बोलके व ऋतिक मोहरले तेथे आलेत. त्यांनी यश याला मारहाण करण्याचा देखावा केला. त्यानंतर तिघांनाही मुलीवर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर यशने प्रेयसीला घरी सोडले.

दुसऱ्या दिवशी सकाळी ती दूध आणायला गेली. यावेळी अभिनेश हा तिला भेटला. तिला पुन्हा अत्याचाराची धमकी दिली. पीडित मुलगी घरी गेली. रडायला लागली. आईने तिला विचारणा केली. सामूहिक अत्याचाराची आपबिती तिने सांगितली. त्यानंतर आईने मुलीसह जरीपटका पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. तिघेही यश याचेच मित्र असून यशनेच तिघांना तेथे बोलाविले होते, असे तपासादरम्यान समोर आले आहे.

आणखी बातम्या वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here