म. टा. प्रतिनिधी, नगर: नगरच्या कोतवाली ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक व सध्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस अधिकारी विकास वाघ याच्याविरोधात तरुणीचा छळ करून तिच्यावर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने तक्रार केली आहे. त्यावरून कोतवाली पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी वाघ गुन्हा दाखल होताच फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

पीडित तरुणी २०१९ मध्ये एका प्रकरणात तक्रार देण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात आली होती. या २६ वर्षीय तरुणीशी वाघ याने ओळख वाढवली. काही दिवसानंतर वाघ हा पीडित तरुणीच्या घरी गेला. तेथे तिला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी तरुणीने प्रतिकार केला तेव्हा वाघ याने तिला कंबरपट्ट्याने जबर मारहाण केली. तसेच ‘ही घटना कुणाला सांगितली तर तुझे कुटुंब संपवून टाकील’ अशी धमकी दिली. त्यानंतर वाघ याने पीडितेवर अनेकदा अत्याचार केले. पीडित तरुणी गरोदर राहिल्याची बाब वाघ याला समजल्यानंतर त्याने २६ सप्टेंबर २०१९ रोजी तिला तो राहत असलेल्या बंगल्यावर नेऊन मारहाण करत जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खायला दिल्या. या त्रासाला कंटाळून पीडितेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला. ही बाब वाघ याला समजल्यानंतर त्याने पीडितेला एमआयडीसी परिसरात नेऊन धमकी दिली, तसेच स्टॅम्प पेपरवर तिच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यानंतर ११ सप्टेंबर २०२० रोजी वाघ याने पीडितेला जबरदस्तीने नगर तालुक्यातील मिरावली पहाड येथे नेऊन तेथेही तिच्यावर अत्याचार करीत जिवे मारण्याची धमकी दिली, असे पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी बातम्या वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here