मुंबईः उत्तर प्रदेशमधील प्रकरणावर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना नेते यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. एका गरीब मुलीला न्याय मिळू नये का? का न्याय मागण्यासाठी एखादी नटीच हवी का? असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे,

‘जिथं राम मंदिराची उभारणी होत आहे तिथे हाथरससारख्या जिल्ह्यात मुलीवर बलात्कर होतो, हत्या होते, आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. एरवी कोणाच्या घराची कौलं जरी उडवली, एखाद्या नटीवर अन्याय, अत्याचार झाला म्हणून ओरडणारे आता कुठेत? तो मीडिया कुठे? एका गरीब मुलीला न्याय मिळू नये का? न्याय मागण्यासाठी एखादी नटी, अभिनेत्रीच हवी आहे का?’ असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

‘रामदास आठवले जे नटीच्या घरी जाऊन सुरक्षा देत होते, नटीच्या स्वागतासाठी विमानतळावर कार्यकर्ते होते ते गेले कुठे? काल राजभवनात गेले होते. हाथरसमधील मुलगी आपली कोणी लागत नाही का? तीसुद्धा आपलीच आहे. तिच्यासाठी ट्विटर व सोशल मीडियावर मोठं आंदोलन छेडण्यात आलेलं ते दिसत नाही. एकेकाळी खंबीरपणे लढणारी दलित चळवळ निस्तेज होताना दिसतोय. एका दलित मुलीवर अत्याचार होतो, बलात्कार होतो आणि कोणीही उसळून उठत नाही,’ अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

‘दिल्लीत जेव्हा निर्भया प्रकरण झालं तेव्हा आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो होतो. मीडियाची त्यात महत्त्वाची भूमिका होती. संसद १५ दिवस आम्ही सुरू करु दिली नाही. आज या नव्या राजवटीत मला हाथरस प्रकरणी निराशा दिसतेय कारण ती मुलगी गरीब आहे,’ असंही संजय राऊत म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here