पेइचिंग: चीनमध्ये एका शिक्षिकेला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तिने नर्सरीतील २५ मुलांना नाश्त्यातून विष दिले होते. या प्रकरणात तिला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. या २५ मुलांपैकी एका मुलाचा मृत्यू झाला होता. या शिक्षिका वांग यून हिला हेनान प्रांतातील परिसरातून अटक केली होती. सकाळी नाश्ता दिला होता. ते खाल्ल्यानंतर मुले आजारी पडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील एका मुलाचा मृत्यू झाला होता.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिक्षिकेचे आपल्या सहकाऱ्याशी बाचाबाची झाली होती. त्याचा सूड घेण्यासाठी तिने मुलांना दिलेल्या नाश्त्यामध्ये विषारी पदार्थ मिसळला होता. गेल्या वर्षी २७ मार्च रोजी ही घटना घडली होती. जिआआजूच्या कोर्टाने हा निकाल दिला.
मुलांना नाश्ता दिल्यानंतर मुलांना उलटीचा त्रास होऊ लागला आणि काही जण बेशुद्ध झाले. या घटनेची चौकशी केली असता, शिक्षिकेने २५ मुलांना विष दिले होते. ते सर्व जण आजारी पडले होते. त्यातील एका मुलाचा १० महिन्यानंतर मृत्यू झाला. या प्रकरणी कोर्टाने निकाल दिला असून, दोषी शिक्षिकेला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times