हैदराबाद : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( ) पक्षाचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार () यांनी प्रकरणातील न्यायालयाच्या निर्णयानंतर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.’ न्यायालयाच्या तारखेचा हा काळा दिवस’ असल्याची प्रतिक्रिया यांनी व्यक्त केलीय. चक्क न्यायालयाच्या बाहेर उभं राहून विध्वंसाची गोष्ट स्वीकार करणाऱ्यांची न्यायालय निर्दोष मुक्तता करत आहे, यावरही ओवैसी यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. उल्लेखनीय म्हणजे, ‘आम्हाला विश्वास आहे की तिथे मंदिर होतं आणि मंदिर राहणार. आम्हीच मशीद तोडली. रामलल्लासाठी तुरुंगात जाण्यास आणि फासावर चढायला तयार आहोत’ अशी वक्तव्यं आज सीबीआय कोर्टानं निर्णय सुनावण्याआधी सुनावणीसाठी न्यायालय परिसरात पोहचलेल्या रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य (Ram Vilas Vedanti) यांनी मीडियाशी बोलताना केली होती. यावरच ओवैसींनी निशाणा साधला.

सीबीआय विशेष न्यायालयाचा निर्णय हा अन्यायकारक असल्याचं म्हणतानाच त्यांनी ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाकडे या निर्णयाला आव्हान देण्याची विनंती केलीय. दरम्यान, कोर्टाच्या निर्णयाला आव्हान द्यायचं किंवा नाही तसंच आव्हान देण्यात काही अर्थ आहे किंवा नाही याचा निर्णय मुस्लीम संघटनांशी चर्चा केल्यानंतर घेतला जाईल, असं ‘ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’च्या सदस्यांनी म्हटलंय.

वाचा :

वाचा :

‘काळा दिवस’
‘सर्वोच्च न्यायालयानं हे मान्य केलंय की घटनास्थळी बांधकाम पाडण्यात आलं. परंतु, आजचा हा दिवस काळा दिवस म्हणून आठवणीत ठेवला जाईल. एखाद्या जादूनं मूर्त्या ठेवण्यात आल्या होत्या का? जादूनं टाळे उघडण्यात आले होते? की जादूनं मशीद पाडण्यात आली?’ असे प्रश्नही ओवैसी यांनी विचारलेत.

‘लालकृष्ण आडवाणी यांची रथ यात्रा ज्या ज्या ठिकाणांहून गेली तिथं तिथं रक्तरंजित संघर्ष घडला. एवढ्या महिन्यांपासून तयारी सुरू होती, तर मग हे अचानक कसं होऊ शकतं?’ असंही ओवैसी यांनी म्हटलंय.

‘मशीद पाडण्यात आली तेव्हा हेच लोक मिठाई वाटत होते, आनंद साजरा करत होते. एक धक्का और दो, बाबरी मशीद तोड दो असे नारे उमा भारतींनी दिले होते. उभारण्यावर बंदी आहे पाडण्यावर नाही, असं कल्याण सिंह यांनी म्हटल्याचा उल्लेख चार्जशीटमध्ये करण्यात आला होता. ५ डिसेंबर रोजी विनय कटियार यांच्या घरी एक बैठक पार पडली होती. यात लालकृष्ण आडवाणीही सहभागी झाले होते’ असं म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी न्यायालयाच्या या निकालावर नाराजी व्यक्त केली.

वाचा :

वाचा :

‘मशीद वाचवू शकलो नव्हतो तेव्हा मला माझीच लाज वाटली होती आता असा निर्णय देत आहेत. जप सरकारकडून लालकृष्ण आडवाणी यांना सन्मानित करण्यात आलं, तेव्हाच हे स्पष्ट झालं होतं की निकाल काय येणार’ असंही ओवैसी यांनी म्हटलंय.

आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरूनही ओवैसी यांनी या प्रकरणावर भाष्य केलंय. ‘कातिल, वही मुंसिफ, अदालत उस की, वो शाहिद… बहुत से फैसलों में अब तरफदारी भी होती है’ असं म्हणत न्यायालयाच्या निर्णयावर ओवैसी यांनी नाराजी व्यक्त केलीय.

बुधवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं या प्रकरणात आपला निर्णय सुनावताना, लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासहीत ३२ आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष करण्यात येत असल्याचं म्हटलंय. बाबरी मशीद विध्वंस हा पूर्वनियोजित कट नसून असामाजिक तत्वांनी अचानक केलेली कृती होती, असंही न्यायालयानं आपल्या निर्णयात नमूद केलंय. शिवाय बाबरी प्रकरणी सीबीआयकडून दाखल करण्यात आलेले फोटो, व्हिडिओ पुरावे म्हणून मान्यता देण्यास न्यायालयानं नकार देतानाच ठोस पुराव्यांअभावी न्यायालयानं सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here