सरकार बदलले की योजना आणि विभागांची नावे बदलली जातात. पहिले सरकार पुन्हा आले की बदलेली नावे पुन्हा पूर्ववत केली जातात. असाच काहीसा प्रकार याही बाबतीत झाला आहे. मात्र, यासाठी सरकारने कारण दिले आहे की, या विभागाच्या नावात रोजगार शब्दच नसल्याने रोजगार व स्वयंरोजगाराशी संबंधित विभाग कोणता? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या विभागाचे नाव आता ‘कौशल्य विकास, विभाग’ असे करण्यात आले आहे.
वाचा:
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात १९९७ मध्ये हा विभाग सुरू झाला. पूर्वी एम्पालयमेंट एक्सचेंज नावाने हे कार्यालय ओळखले जात होते. या विभागाकडे उमेदवारांची नोंदणी केली जात होती. त्यानंतर त्यांच्या पात्रतेनुसार नोकरीसाठी शिफारशी केल्या जात होत्या. येथील नोंदणी आणि शिफारस याला एकेकाळी खूप महत्व होते. पुढे नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत गेले. तसे या कार्यालयाचे महत्वही कमी होत गेले. त्यामुळे त्याच्या कामाचे स्वरूप बदलण्यात आले. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर २०१५ मध्ये या विभागाचे नाव बदलण्यात आले. ‘कौशल्य विकास व उद्योजकता’ असे नाव दिलेल्या या विभागाच्या कामाचे स्वरूपही बदलण्यात आले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, त्यांच्याशी संबंधित सर्व कार्यालये, संस्था या विभागाला जोडण्यात आल्या. त्यानुसार आतापर्यंत काम सुरू होते.
मात्र, मूळ रोजगार व स्वयंरोजगार याच्याशी संबंधित विषय कोणत्या विभागाकडे द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने आता या विभागाचा नामविस्तार करून त्यामध्ये रोजगार हा शब्द आणला आहे. त्यामुळे तांत्रिक अडचण दूर झाली. भाजपने जेव्हा नाव बदलले तेव्हा रोजगाराची जबाबदारी सरकार झटकत असल्याची टीका झाली होती. त्या पार्श्वभूमिवर आघाडी सरकारने किमान विभागाच्या नावात तरी पुन्हा रोजगार आणला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times