नवी दिल्ली : हाथरस सामूहिक बलात्कार आणि पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून देण्यात आलेली वागणूक समोर आल्यानंतर जनतेचा आक्रोश बाहेर पडताना दिसतोय. त्यामुळे हाथरस शहरात तणावाचं वातावरण दिसून येतंय. दुसरीकडे या घटनेनंतर विरोधकांनी मुख्यमंत्री यांना निशाण्यावर घेतलंय. या प्रकरणात कारवाई करण्यासाठी योगी आदित्यनाथ १५ दिवस पंतप्रधानांच्या फोनची वाट पाहत होते का? असा सवाल काँग्रेस महासचिव वाड्रा यांनी विचारलाय.

‘मी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारू इच्छिते’ असं म्हणत प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट टीका केलीय. ‘कुटुंबीयांकडून जबरदस्तीनं पीडितेचं शव ताब्यात घेत जाळून टाकण्याचे आदेश कुणी दिले? गेल्या १४ दिवसांपासून तुम्ही झोपलेलात का? तेव्हा तुम्ही कारवाई का केली नाही?’ असे प्रश्न विचारत प्रियांका यांना योगींना अडचणीत आणलंय.

‘ही घटना १४ तारखेला घडली. आज ३० तारीख आहे. आज पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर भाष्य केलंय. यावेळी, त्यांनी पंतप्रधानांकडून फोन केला आणि एसआयटी नियुक्त करण्यात आल्याचं आज योगींनी म्हटलं. कारवाई करण्यासाठी तुम्ही पंतप्रधानांच्या फोनची वाट पाहत होता काय? गेल्या १५ दिवसांत तुम्ही काहीही करू शकला नाहीत?’ असं म्हणत प्रियांका गांधी यांनी राज्य सरकारचा ढिसाळ कारभारावर टीका केलीय.

संबंधित बातम्या :

वाचा :

वाचा :

वाचा :

वाचा :

‘पीडित मुलीला उपचारांसाठी चांगल्या रुग्णालयात लवकरच हलवण्यात आलं नाही. परवा रात्री तिला दिल्लीला आणण्यात आलं. तिच्या कुटुंबीयांसोबत अमानवीय व्यवहार करण्यात आला. आपल्या मुलीचा मृतदेहही शेवटी एकदा ते आपल्या घरी नेऊ शकले नाहीत. तिच्या मृतदेहावर वडिलांनाच अंत्यसंस्कार करता आले नाहीत. कुटुंबाला एका घरात कोंडून ठेवण्यात आलं. हे अमानवीयतेचं सर्वात मोठं उदाहरण आहे. काय काय होतंय उत्तर प्रदेशमध्ये आणि मुख्यमंत्री कोणतीही जबाबदारीपासून पळ काढतात. तुमच्या राज्यात महिलांच्या सुरक्षेची कोणतीही चिंता नाही, जबाबदारी नाही? मग तुम्ही कसे मुख्यमंत्री आहात’ असं म्हणत प्रियांका गांधी यांनी थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धारेवर धरलंय.

उत्तर प्रदेशातील हाथरस इथं अनुसूचित जातीतील १९ वर्षीय तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याचं समोर आलं होतं. अत्याचारानंतर तिची जीभ कापण्यात आली, तिच्या पाठीचा मणका तोडण्यात आला आणि आता पोलिसांनी तिचे अंत्यविधीही गुपचूप मध्यरात्री उरकून टाकले, असे आरोप पीडितेच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलेत.

इतर बातम्या :

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here