तालुक्यातील अकलापूर गावात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखदेव किसन मधे (वय ४६) याला दारूचे व्यसन होते. त्यावरून पत्नी आणि कुटुंबासोबत त्याची भांडणे होत असत. मंगळवारी रात्री मद्यपान करून तो घरी आला. त्याच्या मुलाने जेवणासाठी त्याला हाक मारली. त्यावेळी त्याने जेवण करण्यास नकार दिला. काही वेळाने त्याचे पत्नीसोबत भांडण झाले. तेव्हाही मुलाने मध्यस्थी केली. त्यानंतर रागाच्या भरात सुखदेव याने खोलीत जाऊन दरवाजा बंद करून घेतला. काही वेळाने खोलीतून स्फोटाचा आवाज आल्याने सर्वांनी तेथे धाव घेतली. तेव्हा सुखदेव याचे शिर धडावेगळे झाल्याचे दिसून आले. त्याने जिलेटिनची कांडी तोंडात धरून खोलीतील प्लगमध्ये वायर घालून वीज प्रवाह सुरू केला आणि स्फोट घडवून आणला.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंबादास भुसारे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून शिर्डी येथील बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचरण करण्यात आले होते. अनिकेत मधे यांनी दिलेल्या माहितीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times