पालघरः मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रक आणि बसच्या झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात २४ जण जखमी झाले असून त्यातील ३ जण गंभीर जखमी आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील मनोर जवळील चिल्हार फाटाजवळ हा झाला.

आज सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली. ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने तो बसवर जाऊन आदळला. या अपघातात बसच्या चालकाचा मृत्यू झाला असून अन्य २४ प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मुंबई-गुजरात प्रवाशी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स कंपनीची (RJ-27-PB-6929) बस प्रवाशी घेऊन गुजरातच्या दिशेने जात होती. मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास महामार्गावरील मनोर- मस्तान नाका पासून तीन किमी अंतरावरील चिल्हार फाटा उड्डाणपूलाच्या सुरुवातीला मुंबई मार्गीकेवरून उड्डाणपूलाच्या उतारावर ब्रेक निकामी झालेला ट्रक दुभाजक तोडून गुजरातकडे जाणाऱ्या बसला धडकला. या अपघातात ट्रकच्या ड्राइवर केबिनचा चक्काचूर झाला असून प्रवाश्यांनी भरलेली बस रस्त्यावर उलटली. अपघातात बसच्या मालकाचा जागीच मृत्यू झाला असून २४ प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना मुंबई – तसेच गुजरातमधील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here