मुंबईः उत्तर प्रदेश येथील हाथसरमध्ये घडलेल्या १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची तीव्र लाट उमटली आहे. या घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षातर्फे १ ऑक्टॉबर रोजी दुपारी १ वाजता आझाद मैदानात निषेद आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा यांनी केली आहे.

हाथसर हत्याकांडानंतर देशातील राजकारण ही तापले आहे. या घटनेमुळं उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवसेना नेता संजय राऊत यांनी रामदास आठवले यांच्यावर निशाणा साधला होता. रामदास आठवले जे नटीच्या घरी जाऊन सुरक्षा देत होते, नटीच्या स्वागतासाठी विमानतळावर त्यांचे कार्यकर्ते होते ते गेले कुठे? असा सवाल केला होता. त्याचबरोबर एकेकाळी खंबीरपणे लढणारी दलित चळवळ निस्तेज होताना दिसत आहे, असंही ते म्हणाले होते. त्यानंतर रामदास आठवलेंनी ही भूमिका घेतल्याची चर्चा रंगत आहे.

हाथसरमधील पीडित दलित मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराविरुद्ध १ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता आझाद मैदानात रिपाइंकडून आंदोलन करण्यात येणार आहे. तसंच, २ ऑक्टोबर रोजी हाथसरमधील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.

जीभ कापली, पाठीचा कणा मोडला

१९ वर्षांच्या पीडित दलित मुलीवर १४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये चार हैवानांनी क्रूरपणे अत्याचार केले होते. आपलं कृत्य लपवण्यासाठी आणि मुलीनं काही बोलू नये यासाठी त्यांनी सामूहिक बलात्कारानंतर जीभ कापली होती, तसंच पाठीचा कणाही मोडला होता. ग्णालयात दाखल केल्यानंतर ही मुलगी तब्बल नऊ दिवस बेशुद्धावस्थेतच होती. गेले १५ दिवस ती मृत्यूशी झुंजच देत होती अखेर तिची ही लढाई अर्धवट राहिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here