मुंबई: अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात येत असताना महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय जाहीर करताना आणखी काही बाबतीत दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. ( Latest Updates )

लॉकडाऊनबाबत राज्य सरकारने गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार बहुप्रतीक्षित हॉटेल, आणि बारबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ५ ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट आणि बार खुले होणार आहेत. ५० टक्के क्षमतेने ते चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत पर्यावरण विभागाकडून स्वतंत्र गाइडलाइन्स जारी करण्यात येणार आहेत. त्यात कोणती खबरदारी घ्यायची आहे, याबाबत निर्देश देण्यात येणार आहेत.

राज्य सरकारकडून मुंबईच्या डबेवाल्यांनाही खूप मोठा दिलासा देण्यात आला आहे. डबेवाले आता लोकलमधून प्रवास करू शकणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात ते लोकलने प्रवास करू शकतील. त्यासाठी त्यांना मुंबई पोलीस आयुक्तालयातून क्यूआर कोड घ्यावा लागणार आहे.

राज्यातंर्गत रेल्वेसेवेला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. तत्काळ प्रभावाने करोनाबाबतचे नियम व अटी पाळून रेल्वेसेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यात मुंबई-पुणे रेल्वेसेवेला परवानगी देण्यात आल्याने हजारो नोकरदारांना दिलासा मिळणार आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईत लोकल धावत आहेत. या लोकलच्या संख्येत वाढ करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here