राज्य सरकारनं आज अनलॉक-५ बाबत नवीन गाइडलाइन जारी केल्या आहेत. त्यानुसार राज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असून कंटेनमेंट झोनमध्ये मात्र पूर्वीप्रमाणेच निर्बंध लागू असताली. सरकारने अनलॉकच्या या टप्प्यात काही अधिकच्या सवलती दिल्या आहेत.
काय सुरू राहणार? आणि काय बंद?
५ ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट व बार सुरू करण्यास परवानगी; एकूण क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच प्रवेश देता येणार
करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचं पालन करून राज्यांतर्गंत रेल्वे प्रवासी वाहतूक तात्काळ सुरू करण्यास परवानगी
मुंबई महानगर प्रदेशातील लोकल रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचे आदेश
मुंबई महानगर प्रदेशांतर्गंत येणाऱ्या अनावश्यक वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या उद्योगांना परवागनी
राज्यानं दिलेल्या करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचं पालन करून पुणे विभागातील लोकल ट्रेन सेवा सुरू करण्याची परवानगी
शाळा, कॉलेज, कोचिंग क्लास ३० ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार
सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, थेटर बंदच राहणार
राजकीय सभा , सामाजिक सामारंभ यावर घातलेले निर्बंध कायम
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times