मुंबई: केंद्र सरकारने नुकतेच संमत केलेल्या कृषिविषयक कायद्यांच्या राज्यातील अंमलबजावणी संदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

वाचा:

केंद्राने जे केले आहेत त्या अनुषंगाने राज्यातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील चर्चा करण्यात येणार असून त्याआधारे योग्य त्या सुधारणांचा मसुदा मंत्रिमंडळ उपसमितीसमोर सादर करण्यात येईल व त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांचे उत्पादन व्यापार आणि व्यवहार (प्रोत्साहन आणि सुविधा) कायदा २०२०, शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) आश्वासित किंमत आणि सेवा करार कायदा, अत्यावश्यक वस्तू सुधारणा कायदा यांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर मंत्रिमंडळाने उपसमिती स्थापण्याचा निर्णय घेतला.

वाचा:

केंद्राने केलेल्या नवीन कृषी कायद्यांविरुद्ध शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. पंजाब आणि हरयाणा या राज्यांत या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसने या कायद्यांविरुद्ध अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासित राज्यांनी हे कायदे फेटाळावेत असा संदेश सोनिया गांधी यांनी दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात या कायद्यांचे काय होणार?, हा कळीचा प्रश्न बनला आहे. राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याबाबत आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रात या कायद्यांची अंमलबजावणी केली जाणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारचा या विधेयकांना ठाम विरोध आहे आणि या मुद्द्यावर शिवसेना आमच्यासोबत आहे आणि तिन्ही पक्ष एकत्र चर्चा करून याबाबत पुढील रणनिती ठरवणार आहोत, असे थोरात म्हणाले होते. त्यानंतर काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन हे कायदे रद्द करण्याची मागणी करणारे निवेदनही सादर केले होते. दुसरीकडे काँग्रेसनेही तशाच प्रकारची भूमिका घेतलेली आहे. शिवसेनेकडून मात्र यावर काहीशी सावध भूमिका घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावर अद्याप मतप्रदर्शन केलेले नसले तरी आजचा मंत्रिमंडळाचा निर्णय पाहता ते या विषयात अत्यंत सावध पावले टाकत असल्याचेच स्पष्टपणे दिसत आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here