म. टा. प्रतिनिधी, पुणेः चित्रपट दिग्दर्शक, निर्माते अक्षय इंडीकर (वय 30, रा. गणेशखिंड रस्ता मॉडेल कॉलनी) यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत इंडीकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडीकर यांचे फेसबुकवर अकाउंट आहे. त्यांच्या खात्याचा वापर ते व्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी करतात. त्यांचे पेजचे सहा लिंक आहेत. ते हताळण्याचे अधिकार इंडीकर व त्यांच्या पत्नीकडे आहेत. मात्र, 23 सप्टेंबर रोजी इंडीकर यांच्या पेज ऍडमिन ऍक्‍सेसच्या नोटीफिकेशनमध्ये माहिती आली की, त्यांच्या खात्यात महम्मद मुदासीर, महम्मद इलियास हे दोन अकाऊंड जोडले गेले आहेत. त्यामुळे इंडीकर यांनी फेसबूक पेज पाहिले असता त्यांना ऍडमिन पदावरून हटविले असल्याचे समजले. तसेच, त्यांच्या अकाउंटवर अश्लिल फोटो देखील टाकल्याचे दिसले. अकाउंट हॅक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिस उप निरीक्षक अनिल डफळ हे अधिक तपास करत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here