कोल्हापूर: अरे बाबा, घाल ना, ए राजा तुझा मास्क कुठे आहे? मास्क घालतोस की करू दंड… असे म्हणत महापालिका आयुक्त डॉ. यांनी ‘गावात’ फेरफटका मारला. तो ही चक्क सायकलवरून. सरकारी रुग्णालयात आग लागताच पहाटेच सायकलवरून रुग्णालय गाठणाऱ्या कलेक्टरांच्या नंतर आता आयुक्तांनीही सायकलचा वापर करत जनजागृती सुरू केल्याने हे अधिकारी आता कौतुकाचे विषय ठरले आहेत.

वाचा:

महापालिकेच्या वतीने दर महिन्याचा शेवटचा दिवस हा ‘नो व्हेइकल डे’ म्हणून पाळला जातो. या दिवशी अधिकारी, नगरसेवक, पदाधिकारी यांना महापालिकेत वाहनातून येण्यास मनाई आहे. पण संसर्ग सुरू झाल्यानंतर हा उपक्रम बंद पडला. आता करोना काही प्रमाणात कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा आयुक्तांनीच या उपक्रमाला सुरुवात केली आहे.

गेले काही महिने ते महिन्याचा शेवटचा दिवस महापालिकेचे वाहन वापरत नाहीत. पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी स्वतःवरच हा निर्बंध घालून घेतला आहे. बुधवारी त्यांनी महापालिकेच्या वाहनांऐवजी सायकलचा वापर केला. त्यांनी सकाळी सायकलवरून गावात फेरफटका मारत मास्क तसेच सुरक्षित अंतराच्या नियमविषयी जनजागृती केली.

वाचा:

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आयुक्त कलशेट्टी हे गेले सहा महिने शहरात सतत विविध उपक्रम राबवतानाच दंड आणि कारवाईवरही भर देत आहेत. सकाळी सायकलवरून फिरत त्यांनी ज्यांनी मास्क घातला नाही त्यांना मास्क घालण्याची विनंती केली. काहींना दंड केला. अरे बाबा, मास्क घाल, हे राजा, मास्क घाल नाहीतर दंड करतो असे म्हणत त्यांनी जनजागृती केली. काहींची खरडपट्टीही काढली.

वाचा:

आयुक्त सायकलवर फिरत असल्याचे पाहून अनेकजण अवाक् झाले. काहींनी त्यांच्याबरोबर सेल्फी घेतले. दोन दिवसांपूर्वी सीपीआर या सरकारी रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे पहाटे साडेतीन वाजता आग लागली होती. ही घटना कळताच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सायकलवरूनच सीपीआर गाठले होते. वेळेत पोहचून सूचना देत सर्व व्यवस्था केली होती. त्यानंतर आयुक्तांनीही आता सायकल वरून फेरफटका मारल्याने जिल्ह्यातील या दोन अधिकाऱ्यांची विषयी शहरात आता चर्चा रंगली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here