पुणे: संसारात होत असलेली सासूची लुडबूड सहन न झाल्याने एका सुनेने आपल्या सासूलाच बदडले. या मारहाणीमुळे सासूचा गुडघा फ्रॅक्चर झाला आहे. परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला.

वाचा:

(वय ३०, रा. विश्रांतवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सुनेचे नाव आहे. (वय ५८) यांनी याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. विश्रांतवाडीतील राम मंदीराशेजारी शिंदे कुटुंबीय राहायला आहेत. त्यांचा मुलगा, सून, सासू-सासरा, नातवंडे असा परिवार आहे. किरकोळ कारणामुळे सासू मालती आणि धाकटी सून सविता यांच्यात सातत्याने भांडणे होत होती. त्यामुळे सविताला सासूचा राग येत होता. सततचे टोमणे आणि किरकोळ कारणांवरुन त्यांच्यात वाद होत होते. त्याचा राग आल्यामुळे सविताने १८ सप्टेंबर रोजी सासूला ‘तुझ्यामुळे माझा संसार होत नाही’ असे म्हणत लाथा-बुक्क्यांनी बदडण्यास सुरुवात केली.

वाचा:

सुनेने अचानक हल्ला केल्यामुळे मालती खाली पडल्या. त्यामुळे त्यांच्या गुडघ्याला जखम झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी केल्यानंतर सुनेने केलेल्या मारहाणीत मालती यांचा गुडघा फ्रॅक्चर असल्याचे समोर आले. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी सविताच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक तपास करीत आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here