सुनिल नलावडे, रत्नागिरीः करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात सर्व गोष्टी ऑनलाइन होऊ लागल्या आहेत. शिक्षण, व्यवसाय, पूजा आणि लग्नही. कोकणात साखरपुडा, लग्न समारंभ हे ५० माणसांच्या उपस्थितीत होत आहेत. त्यात आता कोकणवासियही हायटेक झाले आहेत.

रत्नागिरीतील आय. टी. आय सोसायटीतील सेवानिवृत्त श्रीकांत शिंदे यांचे चिरजीव कु. हर्षद शिंदे (इंजिनिअर सायबर स्क्यिुरिटी) यांचा साखरपुडा चि.सौ.का कल्याणीसोबत (स्ट्रकचरल इंजिनिअर) ऑनलाइन (झुम ॲप) वर पद्धतीने शुक्रवारी २५ सप्टेंबरला सकाळी ७.३० वाजता झाला. ऑनलाइन लिंकवरून कॅलिफोर्निया आणि भारत असा हायटेक साखरपुडा पार पडला.

करोनाकाळात लॉकडाऊनच्या परिस्थितीत हायटेक तंत्रज्ञान वापरून देशातील आणि विदेशातील अनेकांनी घरबसल्या या सोहळ्याला उपस्थिती लावली आणि आनंद घेतला. दोघेही अमेरिकेत आहेत आणि दोघांचे आईवडिल भारतात आहे. मुलाचे रत्नागिरीत तर मुलीचे पंढरपूरमध्ये आहेत. दोघांचे आई वडिल इथे असूनही त्यांचा ऑनलाइन पद्धतीने पण पारंपरिक पद्धतीने हा साखरपुडा सोहळा पार पाडला.

कॅलिफोर्नियात मुलगा आणि मुलगी सर्व पूजाविधी करत टिव्ही स्क्रीन समोर दोन्ही घरची मंडळी ओटी भरून मानपान स्विकारले. कॅलिफोर्नियात आपल्या घरी भावी वधुवरांनी ऑनलाइन सर्वाच्या उपस्थिती एकमेकांना साखरपुडयाची अंगठी घातली. हा अत्यंत आगळा वेगळा पण आनंदाचा प्रसंग होता, असं मुलाची आई स्मीतांजली शिंदे म्हणाल्या.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here