उत्तर प्रदेशातील येथील बलात्कारपीडितेवर तिच्या कुटुंबीयांच्या गैरहजेरीत मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले, हे योगी सरकारचे अमानवी आणि न शोभणारे कृत्य आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री यांनी संताप व्यक्त केला.
हाथरस येथील पीडित तरुणीचा अमानवी कृत्यानंतर मृत्यू झाला. तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही तिच्या नातेवाईकांसमोर करण्यात आले नाहीत, याबद्दल पाटील यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली. मुलींना जिवंतपणी सन्मान दिला जातोय, ना मृत्यूनंतर. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत असतील तर त्यांनी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेतली पाहिजे. तुम्ही न्याय, सन्मान आणि समानतेचे राज्य निर्माण करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा कोणताच अधिकार नाही, अशा शब्दांत त्यांनी योगी आदित्यनाथ यांना फटकारले.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये आता कायद्याचे राज्य राहिलेले नाही, तर योगींच्या खास लोकांचे राज्य आले आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी टीका केली. योगी हे महाराज आहेत. परंतु ते राजासारखे राज्य चालवत असून हे लोकशाहीला घातक आहे, असा आरोपही त्यांनी केला.
हाथरसमध्ये दलित बालिकेवर सामुहिक बलात्कार झाल्यानंतर नराधमांनी तिची हत्या झाली. सुरुवातीला फेक न्यूज आहे असे काही घडलेच नाही म्हणणाऱ्या योगी सरकारने त्या बालिकेवर रातोरात अंत्यसंस्कार का केले असा सवालही मलिक यांनी केला आहे. उन्नावमध्ये सेंगरला वाचवण्याचा प्रयत्न झाला तसे या प्रकरणात होता कामा नये असे सांगतानाच, हाथरस प्रकरणी पंतप्रधानांना दु:ख झाले असेल तर योगींचा तात्काळ राजीनामा घेऊन सरकार बरखास्त करावे, अशी मागणीही मलिक यांनी केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times