श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील () शोपियान जिल्ह्यातील अमशीपोरा भागात झालेल्या चकमकीत () मारल्या गेलेल्या एका मजुराचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास पूर्णत्वाकडे गेला असल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरच्या पोलिस महासंचालकांनी माहिती देताना सांगितले. या नंतर हत्येशी संबंधित दोघांना पोलिसांनी अटकही केली आहे. दोघांना आठ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. (three killed on the pretext of being )

चकमकीत ठार झालेल्या मजुराचा मृतदेह कबरीतून काढून कुटुंबीयांना देण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी पोलिस महासंचालकांनी दिली. हा मजुर राजौरी भागात राहत होता.

लष्कराने चकमकीच दहशतवाद्यांना ठार केल्याचा केला होता दावा

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, १८ जुलैला लष्कराच्या एका पथकाने अमशीपोरा शोपियानमध्ये तीन दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला होता. हे एका घरात लपून बसल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले होते. या दहशतवाद्यांना चकमकीत मारण्यात आले. मात्र दोनच दिवसांनंतर ज्या तरुणांना ठार करण्यात आले ते दहशतवादी नसून आमची मुले आहेत आणि ती मुले काश्मीरमध्ये मजुरीसाठी गेलेली होती, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. ही माहिती जाहीर होताच सगळीकडे खळबळ उडाली.

डीएनए तपासानंतर झाले स्पष्ट

अबरार अहमद, इम्तियाज अहमद आणि मोहम्मद इबरार असे ठार झालेल्या मजुरांची नावे आहेत. त्यांना काश्मीरमध्येच दफन करण्यात आले होते. मात्र कुटुंबीयांनी या प्रकरणी जिल्हा प्रशासनाशी संपर्क केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. या साठी एसआयटीची देखील स्थापना करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पुरावे गोळा केले. मृतांच्या कुटुंबीयाचा डीएनए नमुने तपाण्यात आले. ते मृतांशी जुळल्याने सर्व काही स्पष्ट झाले.

क्लिक करा आणि वाचा-

हत्या करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले

या प्रकरणी लष्कराने चकमकीत सहभागी असलेल्या लष्करी अधिकारी आणि जवानांविरोधात समरी ऑफ एव्हिडन्सची कारवाई सुरू करण्यात आली. डीएनए तपाणीत मजुरांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा डीएनए जुळल्यानंतर पोलिसांनी तपास अधिक गतीने सुरू केला. या प्रकरणी तपासादरम्यान मंगळवारी पोलिसांनी दोघांना अटक केली. या दोघांचा या हत्येत सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here