‘जर्नल ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स’ या नियतकालिकेत हे संशोधन प्रकाशित झाले आहे. कॅम्ब्रिज विद्यापीठाने म्हटले की, भारतीय वंशाचे तज्ञ राजेश भगत यांच्यासह एक संशोधकांच्या पथकाने हा दावा केला आहे. तापमान एकसमान ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मिक्सिंग व्हेंटिलेशन सिस्टीममधून हवेद्वारे संसर्ग फैलावण्याचा धोका असल्याचे संशोधकांना आढळले. विषाणू मुख्यत्वे हे एअरोसोलमधून फैलावण्याचा धोका आहे. त्याशिवाय लोकांच्या खोकल्यातून, शिंकेतून, बोलताना तोंडातून येणाऱ्या लाळ थेंबातून विषाणू फैलावण्याचा धोका आहे.
वाचा:
वाचा:
त्याशिवाय, पॉल लिन्डेन ऑफ द डिपार्टमेंट ऑफ एप्लाइट मॅथमॅटिक्स अॅण्ड थ्योरोटिक फिजिक्सच्या नेतृत्वात केलेल्या अभ्यासानुसार, इनडोअर ट्रान्समिशन हे आउटडोअर ट्रान्समिशनच्या तुलनेत अधिक आहे. संशोधकांनी विविध पद्धतीने संशोधन केले. यामध्ये मास्कसह आणि मास्कशिवाय श्वास घेणे, बोलणे, चर्चा करणे, हसणे आदींचा काय परिणाम होतो हेही पाहिले. एखादी व्यक्ती कार्यालयात, घरात सारखी फिरत असेल तर त्याच्या श्वासातून होणाऱ्या घटकांच्या प्रसार वेगळा होता.
वाचा:
वाचा:
डीएएमटीपीचे राजेश भगत यांनी सांगितले की, जेव्हा कोणी गरम हवेतून श्वास घेत असेल तर तापमान आणि घनत्वात फरक दिसून येतो. जेव्हा तु्म्ही श्वासोच्छवास करता तेव्हा श्वासातील घटक छताजवळ जमा होतात. मात्र, संसर्गाचा धोका आहे अथवा नाही यासाठी इतरही अनेक घटक महत्त्वाचे ठरतात. यामध्ये व्हेंटिलेशन यंत्रणेचा प्रकार, दरवाज उघडणे आणि बंद करण्याची पद्धत, आदी घटकांचाही परिणाम होत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
दरम्यान, विषाणूचा संसर्ग जगभरात थैमान घालत आहे. मागील नऊ महिन्यांपासून करोनाच्या थैमानासमोर संपूर्ण जग हतबल झाले आहे. नऊ महिन्यानंतरही करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत जगभरात करोनाच्या संसर्गामुळे १० लाखजणांचे प्राण गेले आहेत. करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या बाधितांचा आकडा हा जेरुसलम, ऑस्टिन किंवा टेक्सास शहराच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. हा आकडा २००४ मध्ये आलेल्या भूकंप, हिंदी महासागरात आलेल्या त्सुनामीत ठार झालेल्या नागरिकांच्या चारपटीने अधिक आहे. करोना महासाथीच्या आजारात दर दिवशी सरासरी पाच हजार नागरिकांचा मृत्यू होत आहे. आतापर्यंत करोनाच्या संसर्गाला पूर्णपणे मात देईल अशी लस, औषध विकसित न झाल्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times