मुंबईः राज्यात सर्वसामान्यांबरोबर लोकप्रतिनिधींनाही करोनाचा विळखा पडत चालला आहे. राज्य सरकारमधील डझनभराहून अधिक मंत्र्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आज नारायण राणे यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

‘माझा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल,’ असा विश्वास यांनी व्यक्त केला आहे.

करोनाची साथ आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात लोकप्रतिनिधी विविध कामानिम्मित मतदारसंघात व जनतेमध्ये फिरत आहे. बैठका व अन्य जबाबदाऱ्यांमुळं त्यांचा अधिकारी व पोलिसांशी संपर्क येत आहे. त्यामुळंच लोकप्रतिनिधींना करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनांही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, काही महिन्यांपूर्वी नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनादेखील करोनाचा संसर्ग झाला होता. योग्य उपचारांनंतर ते करोनामुक्त होऊन पुन्हा लोकसेवेत रुजू झाले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here