मुंबईः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात ट्वीट केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकारण रंगलं आहे. पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे विरोधी पक्षानं मात्र स्वागत केलं आहे. भाजपा आमदार राम कदम यांनी त्यांच्या या विधानाला पाठिंबा दिला आहे.

राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यापासून मराठा समाजात अस्वस्थता आहे. याच मुद्द्यावरून बीड जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यांनं आत्महत्या केली आहे. याच घटनेवर पार्थ पवार यांनी ट्विट केलं होतं. अशा दुर्देवी घटनांचं सत्र सुरू होण्याआधीच मराठा नेत्यांनी जागं व्हाव आणि आरक्षणासाठी लढायला हवं, असं पार्थ पवार यांनी म्हटलं आहे. भाजप नेते यांनी याचमुद्द्यावरून राज्य सरकारला पुन्हा एकदा घेरलं आहे.

‘महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत आक्रमकपणे पुढे यावं. पार्थ पवार यांनी केलेल्या या मागणीला महाविकासआघाडी गंभीर दखल घेत किंमत देणार का? की कवडीची किंमत देणार?’ असा बोचरा सवाल त्यांनी या वेळी केला आहे.

दरम्यान, ‘मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची आक्रमक भूमिका पार्थ पवार यांनी घेतली आहे. सध्या न्यायालयापुढं प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. ही मशाल पुढं नेण्यासाठी मी तयार आहे. लाखो तरुणांना न्याय मिळावा म्हणून मी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे,’ अशी रोखठोक भूमिका पार्थ यांनी घेतली आहे.

पार्थ पवार यांनी न्यायालयीन लढाई लढण्याचा ईशारा दिल्यानंतर राज्य सरकारच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अद्याप पार्थ यांच्या या ट्विटवर कोणतीही प्रतिक्रिया आली नाहीये. त्यामुळं, आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांसदर्भात काय भूमिका घेणार याकडं सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here