पुणे: उत्तर प्रदेशातील हाथरस व त्यानंतर बलरामपूर येथे झालेल्या सामूहिक बलात्कारांच्या घटनांनी अवघा देश हादरला आहे. संपूर्ण देशभरातून या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून उत्तर प्रदेश सरकारवर टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार यांनीही उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेशात ‘बेटी बचाओ, बेटी पढावो’ या केंद्र सरकारच्या मोहिमेच्या अगदी उलट कारभार सुरू आहे. हाथरस येथील घटनेनंतर बलरामपूर येथे सामूहिक बलात्कार व हत्येची आणखी एक घटना उजेडात आली. हे कधी थांबणार आहे?,’ असा उद्विग्न सवाल त्यांनी केला आहे. ‘या अमानुष घटना थांबविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून कठोर कायदे करण्याची व ते राबविण्याची गरज आहे,’ असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. ‘महिलांचा आदर-सन्मान करणाऱ्या आपल्या संस्कृतीत त्यांच्यावर बलात्कार करून खून करणं हे अत्यंत लाजिरवाणं कृत्य आहे. पण उत्तर प्रदेशात वारंवार अशा घटना होता आहेत. हाथरस व बलरामपूर या दोन्ही घटनेतील आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फासावर लटकवा,’ अशी मागणी रोहित पवार यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडं केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here