विक्रमसिंग जगतसिंग बनाफर (वय ३०, रा. नर्मदा कॉलनी, फ्रेण्ड्स कॉलनी),असे अटकेतील पोलीस शिपायाचे नाव आहे. तो पोलीस मुख्यालयात तैनात आहे. ३३ वर्षीय महिला खासगी कंपनीत लिपिक आहे. ती घटस्फोटित असून, अंबाझरी परिसरात राहाते. याच कंपनीत विक्रमसिंग हा कामाला होता. त्यामुळे तो महिलेला ओळखायचा. २०१६ मध्ये तो पोलीस दलात रूजू झाला. पोलीस झाल्यानंतर विक्रमसिंग याने महिलेसोबत ओळख वाढवली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवले. २०१७ मध्ये पीडित महिलेसह तो बेलतरोडीतील श्रीकृष्णा एनक्लेव्ह येथे राहणाऱ्या मित्राच्या फ्लॅटवर आला. तिथे महिलेला नाश्त्यातून गुंगीचे औषध दिले. ती बेशुद्ध झाली. विक्रमसिंग याने तिच्यावर अत्याचार केले. मोबाइलद्वारे अत्याचाराची चित्रफितही काढली. ही चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन तो महिलेचे वारंवार शोषण करायला लागला. सहा महिन्यांपूर्वी विक्रमसिंग याचे लग्न झाले. लग्नानंतर तो महिलेला आणखी त्रास द्यायला लागला. त्रास असह्य झाल्याने पीडित महिलेने बेलतरोडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचार व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून विक्रमसिंग याला अटक केली.
आणखी बातम्या वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times